प्रतिनिधी / सरवडे
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असुन आज रविवारी अंबाबाईचे दर्शन घेतले असुन या नंतर त्या सोमवार दि. ८ नोव्हेंबर रोजी क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली असून मंदीर समितीने भेटीची तयारी केली आहे.
भेटी प्रसंगी त्यांच्या सुरक्षतेकरिता मंदिर परिसरात असणारी सर्व दुकाने बंद करण्यासाठी जिल्हाप्रशासनाने आदेश दिले असून सर्व दुकानदारांनी दुपारी १२ पर्यंत बंद करावी. यामध्ये कोणीही हयगय केल्यास भुदरगड तालुका प्रशासन यांच्या मार्फ़त कारवाई होणार आहे. तरी सर्व दुकानदारांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच ग्रामपंचायत आदमापूर यांनी केले आहे.