प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे सुपूत्र आणि माजी लष्कर प्रमुख जनरल सुनिथ फ्ढ्रांसिस रॉड्रीग्स यांच्यावर सांत इनेज पणजी येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अग्नी दिला. त्यांच्या सेवा-स्मरणार्थ सरकारच्यावतीने मानवंदना देण्यात आली आणि हवेत गोळीबाराच्या फ्री झाडून श्रध्दांजली अर्पण केली. राज्यपाल श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सरकारातील वरिष्ठ अधिकाऱयांनी देखील पुष्पचक्रे अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव प्रथम पर्वरी येथील होली स्पिरीट चर्चमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचे अनेकांनी दर्शन घेतले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. तिरंगा ध्वजात त्यांचे पार्थिव लपेटून ते अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. चर्चमध्ये त्यांच्या करीता प्रार्थना झाली. तेथून सरकारी इतमामात त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. त्यावेळी सरकारचा मोठा फ्ढाwजफ्ढाटा होता. सरकारी अधिकाऱयांनी त्यांना वेळोवेळी मानवंदना दिली. नौदल, वायूदलाचे अधिकारी अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
जनरल जे. जे. सिंग (निवृत्त), ऍडमिरल अरूण प्रकाश, ऍडमिरल सुरेश मेहता, ऍडमिरल के.बी. सिंग, व्हाईस ऍडमिरल दामणे, लेफ्टनंट जनरल करवाल, लेफ्टनंट जनरल अहलुवालिया (निवृत्त) व इतर अधिकाऱयांनी पुष्पचपे अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. त्यांचे शव पेटीत ठेवून ती पेटी तिरंग्यात गुंडाळण्यात आली होती. त्यांना मानवंदना व अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय व मित्रमंडळी, परिवारातील सदस्य तसेच हितचिंतक, जनता मोठय़ा संख्येने उपस्थित होती.