वार्ताहर/ आनेवाडी
अनेक वर्षानी भेटलेल्या मित्रांनी आपल्या आठवणी जीवंत केल्या, मात्र आपल्यात आता न राहिलेले जीवलग त्यांच्या आठवणी चिरंतन राहव्यात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करण्याचा गुरुजनांच्या उपस्थितित संकल्प करत आमचे ऋणानुबंध कायम राहणार हे दाखवून दिले.
सायगाव (ता. जावळी) येथील लोहिया विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या 2002 सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी 20 वर्षानी एकत्र येत आपल्या गुरुजनांना निमंत्रित करून आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात वर्गशिक्षक मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. माने, जे. डी. जाधव, आर. बी. कापसे, जी. डी. शिंगटे यांच्यासह के. एस. पठाण, संध्या काळे, एस. व्ही. घाडगे, डी के. जाधव, बी. एस. गाढवे, पी. टी. खाडे, एस. के. पवार, एस. व्ही. ससाने, हरी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या संकल्पाचे अनेकांनी स्वागत केले.
यावेळी शाळेसाठी या विद्यार्थ्यांनी दहा पंखे भेट दिले तर दरवर्षी या विद्यालयातील होतकरु व गरजु असणाऱया विद्यार्थ्यांना दरवर्षी सर्व पुस्तकांचा खर्च देण्याचा निर्णय घेतला, तर शाळेसाठी कधीही कोणतीही मदत लागली तर ती करण्याचा देखील या सर्व माजी विद्यार्थ्यानी निर्णय घेतला. आपल्याबरोबर शिक्षण घेतलेले आपलेच स्नेही कै. अमोल निकम, शंभुराजे देशमुख व संदीप शिवणकर या दिवंगत मित्रांच्या स्मरणार्थ केलेल्या आगळ्या वेगळ्या संकल्पामध्ये उपस्थित गुरुजन देखील सहभागी झाले. आमचाही यामध्ये वाटा असेल असे मुख्याध्यापिका माने यांनी सांगितले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यानी मनोगते व्यक्त करताना शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाधान भोसले, शक्तिकुमार देशमाने, अंकुश जाधव, नीलेश शिवणकर, योगेश किर्वे, मनोज कदम, मनोज कलशेट्टी, सचिन लेभे, खण्डेराया जाधव, नितिन इथापे, संदीप जाधव, महेश शेळके, लीना शिवणकर, रेखा नाईक, अनिता देशमुख, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समाधान भोसले यांनी तर आभार श्रद्धा साळुंखे यांनी मानले,