प्रतिनिधी / गगनबावडा
कोरोना हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी लोकसहभागा शिवाय पर्याय नाही. या हेतूने शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गगनबावडा तालुक्यात करण्यात आला.
प्रभारी तहसिलदार संजय वळवी व गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी तहसिल कार्यालयात यांचा शुभारंभ केला. तसेच जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती संगिता दादू पाटील यांच्या हस्ते निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयकूमार गवळी, विस्तार अधिकारी अर्जून इंगळे,विजय सावंत, आय. व्ही. पूजारी इत्यादी उपस्थित होते.