मा.ना.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठकीत सहभाग
प्रतिनिधी/ कराड
महाराष्ट्र शासनाचा ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम जिह्यात शहरांसह वाडी- वस्ती व गावपातळीवर पोहचणार असून या उपक्रमांतर्गत जिह्यात लोकांच्या अँटीजन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत. तसेच कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजणांसाठी अधिकचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिह्यचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली.
माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थित असल्याचे कारणाने विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये मा.ना.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठकीस उपस्थित होते.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे उभारण्यात आलेले कोविड सेंटर, क्रांतीसीह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा, सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड तसेच जिह्यातील इतर रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली.