जंगलचा राजा कोण हे दर्शवून देणारे छायाचित्र
तसे पाहिल्यास पूर्ण जंगलच अद्वितीय असते, तेथील प्राणी जंगलाला अधिक सुंदर आणि धोकादायक दोन्ही स्वरुप प्रदान करतात. वाघ आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी जर त्याला कधी प्रत्यक्ष पाहिले असेल तर त्याचा रुबाब माहितच असेल. त्याच्यासमोर बाकी सर्व गोष्टी फिक्या वाटू लागतात. जंगलचा राजा कोण हे पुन्हा दर्शवून देणारे एक छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हे छायाचित्र प्रसारित केले आहे. ‘माझी जमीन माझे नियम’ अशी कॅप्शनही त्यांनी टाकली आहे. या छायाचित्रात एक वाघ रस्त्यावर बसलेला आणि त्याच्यामागे लोक उभे असल्याचे दिसून येतात. वाघामुळे रस्त्यावरील लोक थांबलेले आहेत. वाघ कधी रस्त्यावरून हटतो आणि आपल्याला पुढे जाता येईल याची प्रतीक्षा लोक करताना यात दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जंगलाचा बिग बॉस असे काही जणांनी म्हटले आहे. तर जंगलचा राजा जेव्हा रस्त्यांवर येतो तेव्हा जग थांबते अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली आहे. एकप्रकारे ही चांगलीच बाब आहे. प्राण्यांनाही मुक्तपणे संचार करू देणे गरजेचे आहे.