दिवाळी म्हटलं की एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चौतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी मालिकांमध्ये सुद्धा घडताना दिसणार आहे. पण ह्या वेळेची दिवाळी सगळ्यांसाठीच थोडी वेगळी असणार आहे.
शनाया राधिका मसालेची मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर तिचे राधिका मसालेमध्ये पहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे. राधिका- आनंद भावोजी आणि शनाया सौमित्र यांची भाऊबीज मालिकेत पाहायला मिळेल. लॉकडाऊन नंतर शूट सुरु झाल्यापासून बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांच्या राहण्याची व्यवस्था सेटवरच करण्यांत आली होती आणि गेली 4 महिने हे सर्वजण सेटवरच होते. या सर्वांचा सन्मान म्हणून नवऱयाची बायकोच्या टीमने त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. 4 दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे सर्व मंडळी खुश आहेत कारण त्यांना 4 दिवस का होईना त्यांचा घरच्यांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणार आहे.