ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी केली होती. यावर पार्थ यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. तो इमॅच्युअर (अपरिपक्व) आहेे.
पुढे ते म्हणाले, माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. एवढं करुनही ज्यांना सीबीआय चौकशी हवी असेल, तर माझा त्याला विरोध नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली, तर पुढे काय करायचे? याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, शरद पवार यांनी मात्र अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, संजय राऊत आणि मी नेहमीच भेटतो.
दरम्यान, पार्थ पवार यांनी आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.