चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
औरंगाबाद/प्रतिनिधी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव झाला होता. या पराभवच खापर त्यांनी याआधीही भाजप नेत्यांच्या माथ्यावर फोडलं होत. आता पुन्हा खैरे यांनी दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मीडियासी संवाद साधताना मंत्री दानवे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला.