ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
मी राजीनामा दिला नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या असल्याचे राज्यमंत्री व शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मी सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर देणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले.
सकाळपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यानंतर अब्दुल सत्तार माध्यमासमोर आले. ते म्हणाले, आज रात्री उशिरा सत्तार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान शिवसेनेचे सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे वृत्त समोर आले होते. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही असा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केला होता.