ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मोहम्मद अझरूद्दीन आणि अन्य तीन जणांविरोधात औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव आहे.
अझरूद्दीन म्हणाले, माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी आहे. याविरोधात मी कायदेशीर सल्ला घेत असून याविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.