ओटवणे / प्रतिनिधी-
माडखोल धवडकी येथील माडखोल माध्यमिक विद्यालय नजिक भर रस्त्यावर रविवारी सकाळीच मगरीचे पिल्लू आढळले. माडखोल – सांगेली भर रस्त्यावर हे पिल्लू येताच त्याला पाहण्यासाठी या मार्गावरून ये जा करणाऱ्यांची गर्दी झाली. या रस्त्यालगतच नदी वाहत असुन या नदीत मगरीचे वास्तव्य आहे. भक्ष्याच्या शोधात ही मगर रस्त्यावर आली. त्यानंतर या मगरीच्या पिल्लाला नजीकच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले