कुर्डुवाडी/प्रतिनिधी :
माढा तालुक्यात आज एकूण १२३ जणांची रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये १२० जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह तर ३ जणांचा पाॅझिटीव्ह आला असून काल उशीराने तीन ३ जाणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. एकूण ६ व्यक्ती नव्याने कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ४८६ झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
तालुक्यात परिते येथे १, पिंपळनेर येथे २,भोसरे येथे २ व कुर्डुवाडी येथे १ असे ६ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर कुर्डुवाडीत पुन्हा नव्याने एक तरुण बाधित आढळला असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष अडागळे यांनी सांगितले.