प्रतिनिधी / कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी परिसरातील अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती केंद्र छापा टाकून उद्धवस्त करण्यात आले. या कारवाईत पाच गुन्हे नोंद करण्यात आले असून 1 लाख 2 हजार 970 रूपयांचा मुद्देमालही नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर संशयित आरोपी अनिल खोत याच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत मोठय़ा प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, तयार दारू, गुळ इत्यादी मुद्देमाल नष्ट करण्यात आला. दाखल केलेल्या गुन्हयांमध्ये 3050 लिटर कच्चे रसायन, 50 लिटर गावठी हातभटटी तयार दारू असा 1 लाख 2 हजार 970 रुपये किंमतीचा साठा केलेला अवैद्य मुद्देमाल नाश करण्यात आला असून या कारवाईत आरोपी अनिल खोत याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई वेळी पथकातील कर्मचाऱयांकडून परिसरात शोध मोहीम राबवली असता आसपास मोठया प्रमाणात लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला. कारवाईत 50 लोखंडी बॅरेल, 2 सिटेक्स टाक्या, 322 पत्र्याचे जये, 4 ऍल्युमिनीअम डबे, रवरी हौज पाईप आदी अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणाऱया साहित्याचा साठा मिळून आला.
हातभट्टीसह बनावट मद्याचे सेवन टाळा ः गणेश पाटील
आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱया हातभट्टी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाया कोणत्याही प्रकारच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहनही अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.