प्रतिनिधी/ म्हसवड
भारत कोव्हिड-19 च्या विळख्यात सापडला असताना माणदेशी फौंडेशन संस्थेने माणदेशी महिला सह्कारी बॅकेच्या मुख्य कार्यालयात येणाया ग्राहकासाठी प्रवेश द्वारा लागतच उभारला ‘सॅनीटरायझेशन टनल ’ (ण्ददह एग्हािम्taहू ऊल्हहात् ).
आज जगभरत ‘करोना’ चे संकट दिवसेंदिवस वाढत असताना देश पातळीवर अनेक स्वरूपाच्या योजना राबविल्या जात आहेत. शिवाय त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न जगभरातू केला जात आहे. विविध देशात व मोठ मोठय़ा शहरातून सोशल डीस्टनस व सॅनीटरायझेशन यावर प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. परंतु दैनंदिन गरजेसाठी काही लोक लॉक-डाऊनच्या काळातही बाहेर पडताना दिसत आहेत. यासाठी म्हणून माणदेशी संस्थेने आपल्या ग्राहकासाठी व एटीएम मध्ये येणाया लोकांसाठी अनोखी सुविधा सुरु केली आहे.
हा छोटासा उपक्रम अगदी माफक खर्चात माणदेशी फौंडेशन संस्थेने स्वप्निल कुलकर्णी यांच्या सहकार्याने आज पासून सुरु केला असून याचे औपचारिक उद्घाटन म्हसवड नगर परिषदेच्या उप-नगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गलांडे हॉस्पिटलचे डॉक्टर जयवंत गलांडे, म्हसवड पोलीस स्टेशन स.पो.नी. कदम साहेब, माणदेशीच्या मुख्याधिकारी रेखाताई कुलकर्णी आदि सारख्या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना स्नेहल सूर्यवंशी म्हणाल्या माणदेशीच सर्वच सेवा सुविधा देण्यात अग्रेसर असून अशी सेवा देणारी जिह्यातील पहिलीच बॅंक आहे. सातारा जिह्यात असा बॉडी-सॅनीटरायझेशनचा उपक्रम प्रथमच माणदेशीने सुरु केला असून मुख्य गेट मधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सपूर्ण बॉडी-सॅनीटरायझेशन या मध्ये होवून त्याचे संपूर्ण निर्जंतुकीकरण होत असल्याने करोना विषाणूचा प्रदुभाव साहजिकच इतरांना होणार नाही हे नक्कीच……!
अनेक देशाने यावर लाखो रुपये खर्च केले असून माणदेशी संस्थेने मात्र अवघ्या तीस हजार रुपये खर्चून फॅब्रीकेटर प्रवीण कबीर व कुशल भागवत यांचे मदतीने हा 9 स 8 एवढय़ा आकाराचा ‘सॅनीटरायझेशन टनल’ उभारला आहे. एटीएम व बॅंकेत येणाया सर्वांचेच यामध्ये बॉडी-सॅनीटरायझेशन होत असल्या बाबतची माहिती स्वप्निल कुलकर्णी यांनी उपस्थीताना दिली व त्याचे प्रथ्याक्षिकहि समजावून दिले.