बेळगाव/ प्रतिनिधी
मूळचे गोजगे गावचे रहिवाशी व सध्या गोंधळी गल्ली येथे वास्तव्यास असलेले मार्केट यार्ड मधील माणिक ट्रेडिंग कंपनी या फर्मचे संचालक माणिक (लक्ष्मण ) एस होनगेकर ( वय ७३) यांचे शनिवारी पहाटे आजाराने दुःखद निधन झाले. मार्केट यार्ड मध्ये आपल्या व्यवसायात त्यानी गेली चाळीस वर्षे चिकाटीने काम करून मोठी व्याप्ती केली होती.
एक प्रगतशील व प्रतिष्टीत व्यापारी म्हणून नाव लौकिक मिळवला होता . ते व्यापाराबरोबरच सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असत व मार्केट यार्ड गोजगे गाव व तालुक्यातील अनेक गावांना ते चांगल्या कार्यासाठी मदत करत असत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता त्यांच्या जाण्याने मार्केट यार्ड सह अनेक क्षेत्रात मोठे दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षेत्रात म्हणजे मार्केट यार्ड मधील रताळी बटाटा व गूळ मार्केट येथे दोन दिवस व्यापाऱ्यांनी आपली दुकानें बंद ठेवून दुखवटा व्यक्त करायचा आहे असे मर्चंट असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांना कळविण्यात आले आहे.