पैसे न देऊ शकणाऱयांना मिळते मोफत जेवण
कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पण जेव्हा खाण्यास काहीच उरणार नाही किंवा कमाविण्यास काहीच नसेल तर काय होणार असे प्रश्न लोकांसमोर आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा प्रभाव देशभरातील लोकांवर दिसून येतो. पण याचदरम्यान काही लोक इतरांच्या भल्यासाठी काम करत आहेत. तामिळनाडूत एक बिर्याणीचे रस्त्यावरील दुकान आहे. तेथे पैसे नसलेल्या लोकांना मोफत जेवण दिले जात आहे.
रेडिओ जॉकी आणि अभिनेता आर.जे. बालाजी यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे. पुलियाकुलमममध्ये एका छोटय़ाच्या रस्त्याच्या कडेला असलेला बिर्याणी शॉपवाला किती चांगले काम करत आहे, माणुसकीच सर्वोत्तम आहे असे त्याने ट्विट करत म्हटले आहे.
महिला चालविले शॉप
हा स्टॉल एक महिला चालविते. ज्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना मोफत खायला देऊ असा बोर्ड महिलेने स्टॉलबाहेर लावला आहे. ‘तुम्ही भुकेले आहात का? प्रेमाने जेवण घेऊन जा’ असेही बोर्डावर नमूद आहे. या स्टॉलच्या छायाचित्राला 24 हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले असून 3500 पेक्षा अधिक जणांनी रीट्विट केले आहे. या खडतर काळात लोकांची अशी मदत करणाऱयांना सलाम करावासा वाटतो.