स्वयंसेविका लूनाला पाहून रडू लागला शरणार्थी
लुनाने शरणार्थीला कवटाळले, जगभरातून कौतुक
माणुसकी व्यक्त करणारे हे छायाचित्र स्पेनच्या सेउता येथील आहे. रेडक्रॉसची स्वयंसेविका लूना रेयस (20 वर्षे) हिने सेनेगल येथून आलेल्या स्थलांतरिताला अत्यंत आपलेपणाने कवटाळून घेतल्याचे यात दिसून येते. हे छायाचित्र स्पेनच्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असता प्रथम लूनाला अश्लील आणि वंशद्वेषी टिप्पणींना तोंड द्यावे लागले.
स्पेनच्या दक्षिणपंथी वोक्स पार्टीच्या समर्थकांनी तिला लक्ष्य केले हेते. परंतु काही तासांनी जगभरातून तिचे कौतुक होऊ लागले. लोक हे छायाचित्र पाहून भावुक झाले आणि हॅशटॅग ‘ग्रेशियस लूना’ ट्रेंड करू लागले. मोरक्कोमधून सुमारे 8000 शरणार्थी स्पेनमध्ये पोहोचले आहेत.
त्याने जेव्हा मला जवळ येताना पाहिले, तेव्हा तो माझा हात पकडुन रडू लागला आणि त्याने मला कवटाळून घेतल्याचे लूनाने म्हटले आहे. हे छायाचित्र एका माणसाचे दुसऱयाशी असलेले नाते व्यक्त करणारे आहे. कोण, कुठला आणि कुठल्या वर्णाचा यामुळे फरक पडत नाही. दोघेही केवळ माणूस होते असे छायाचित्रकार बर्नेट अर्मांग यांनी म्हटले आहे.