प्रतिनिधी/ दहिवडी
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने 17 पैकी 10 जागा मिळवून सत्ता कायम राखली. तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व अनिल देसाई गट यांच्या माण विकास आघाडीला 7 जागा मिळाल्या. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत सर्व प्रथम सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ त्यानंतर ग्रामपंचायत व नंतर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली.
या निवडणुकीत सोसायटी मतदार संघात डंगीरेवाडीचे नेते हरिश्चंद्र जगदाळे तसेच दुसऱयांदा निवडणुकीत उभे असलेले बाळासाहेब जगदाळे पराभूत झाले. तर गेल्या वेळी दोन मताने पराभूत झालेले शेखर गांधी व्यापारी मतदार संघातून विजयी झाले. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांचे चिरंजीव योगेश भोसले यांनी ग्रामपंचायतीमधून विजय संपादन केला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून विजयी- सूर्याजी विश्वासराव जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी), अर्जुन आगतराव बनगर (306 भाजप व रासप), विलास आबा देशमुख (301 भाजप व रासप), दत्तात्रय पांडुरंग सस्ते (287 भाजपव रासप), रमेश दगडू यादव (285 भाजप व रासप), रामचंद्र गणपती कदम (284 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी), कुंडलिक दादासो भोसले (283 राष्ट्रवादी काँगेस आघाडी).
सोसायटी मतदार संघ महिला राखीव- निर्मला नंदकुमार जाधव (314 भाजप व रासप), वैशाली बाबासो वीरकर (302 भाजप व रासप).
सोसायटी मतदार संघ इतर मागास प्रवर्ग- अमोल साहेबराव राऊत (308 भाजप व रासप).
सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती जमाती- रामचंद्र श्रीरंग झिमल (306 राष्ट्रवादी काँगेस आघाडी)
ग्रामपंचायत मतदार संघातून विजयी उमेदवार- बाळकृष्ण किसन काळे (420 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी), योगेश महादेव भोसले (366 राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी).
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती- रविंद्र पोपट तुपे (371 भाजप व रासप),
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल- ब्रह्मदेव तुकाराम पुकळे (385 भाजप व रासप).
व्यापारी मतदार संघ विजयी उमेदवार- किसन चंद्रोजी सावंत (195 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी), शेखर मोतीलाल गांधी (153 भाजप).
सोसायटी मतदार संघातून विजयी उमेदवाराला 283 मतदान मिळाले. व पराभूत उमेदवाराला 281 मते मिळाली. त्यामुळे फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली आहे.