कपिलेश्वर कॉलनी बीएसएनएल ऑफिसनजीक डेनेज पाईपलाईनसाठी खोदाई
प्रतिनिधी / बेळगाव
येथील कपिलेश्वर कॉलनी बीएसएनएल ऑफिसनजीक डेनेज पाईपलाईन घालण्याकरिता व रस्त्याच्या कामाकरिता खोदाई करण्यात आल्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. परिणामी येथून ये-जा करणाऱया वाहनधारकांना या ढिगाऱयामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तसेच रात्री देखील या ढिगाऱयांमुळे अनेक अपघातही होत
आहेत.
रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रस्ता देखील निमुळता झाला आहे. तसेच रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही परिस्थिती तशीच असून वाहनधारकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे.
तसेच या मातीच्या ढिगाऱयामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील रस्ता लवकरात लवकर करावा व येथील मातीचा ढिगारा ताबडतोब हटवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.