पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कस व ग्रामस्थ याना लसीकरण
मातोंड/ प्रतिनिधी-
तालुक्यातील मातोंड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे येथे सोमवार (१४ जाने) कोविशील्ड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. येथील कै देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय परब यांनी उपकेंद्राला कायमस्वरूपी इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिल्याने व येथील युवक मंडळाच्या सहकार्याने मातोंड मधील नागरिकांना लसीकरणाची सोय उपलब्ध झाली आहे.
या लसीकरणाचा शुभारंभ सरपंच जानवी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपसरपंच अस्मिता परब, ग्रा प सदस्य महानंदा घाडी, सीताराम जाधव, माजी ग्रा प सदस्य नितीन परब, जेष्ठ गावकर रमाकांत परब, मनसेचे सागर तुळसकर, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण प्रभू, आरोग्य सहाय्यीका श्रीमती पारकर, आरोग्य सेवक भरत मेस्त्री, आरोग्य सेविका संजना कांबळी, पी बी पाटलेकर, मदतनीस विनिता वैद्य, ग्रा प कर्मचारी अरुण रेडकर, दिगंबर मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुखाजी परब, पत्रकार दिपेश परब आदी उपस्थित होते.