ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार थोड्याच वेळात राज्याच्या अर्थसंकल्पाचे वाचन सुरू करणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला काय दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, जनतेच्या राज्यसरकारच्या अर्थसंकल्पातून अपेक्षा आहेतच. मात्र, राज्य सरकार कितपत उदार आहे हे पाहायला मिळेल, अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील मात्र, फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
पुढे ते म्हणाले, कोरोना नियंत्रणावर राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरलेला आहे हे आरोग्य यंत्रणेचा फेल्युअर आहेच, मात्र राज्य सरकारचा देखील फेल्युअर आहे, अशी टीकाही त्यांनी दरेकर यांनी यावेळी केली आहे.