ऑनलाइन टीम / पुणे :
भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) मध्ये मादक पदार्थ सेवन ,धुम्रपान विषयक दुष्परिणामाबाबत सावधानता बाळगण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. बीबीए, बिसिए, एमबीए, एमसीए च्या वर्गांमध्ये या विषयी जागृती करण्यात आली.
आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा उपक्रम झाला.डॉ विनोद इंगवले , डॉ हेमा मिरजी, डॉ निलेश महाजन, डॉ स्वाती देसाई, डॉ.सीमा तार्णेकर हे या उपक्रमात सहभागी झाले .