वृत्तसंस्था/ माद्रिद
डब्ल्यूटीए टूरवरील 29 एप्रिलपासून येथे सुरू होणाऱया माद्रिद खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची वयस्कर टेनिसपटू व्हीनस विल्यम्सला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
40 वर्षीय व्हीनस विल्यम्सने 2018 साली या स्पर्धेत आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. माद्रिद टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड बार्टी, जपानची ओसाका, रुमानियाची हॅलेप तसेच झेकची कॅरोलिना प्लिसकोवा आणि अन्य सिडेड टेनिसपटू सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.