वृत्तसंस्था/ माद्रीद
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या माद्रीद खुल्या क्लेकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने एकेरीत विजयी सलामी देताना आपल्याच देशाच्या डोईचा पराभव केला.
महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत सध्या दुसऱया स्थानावर असलेल्या 23 वर्षीय ओसाकाने शुक्रवारी पहिल्या फेरीतील सामन्यात मिसाकी डोईचा 87 मिनिटांच्या कालावधीत 7-5, 6-2 असा पराभव करताना 6 बिनतोड सर्व्हिची नोंद केली. ग्रीकच्या मारिया सॅकेरीने अमेरिकेच्या ऍनीसिमोव्हाचा 0-6, 6-1, 6-4, अमेरिकेच्या पेगुलाने रूमानियाच्या सिरेस्टीचा 7-6 (7-5), 6-3, रूमानियाच्या तृतीय मानांकित सिमोना हॅलेपने स्पेनच्या टोर्मोचा 6-0, 7-5, रशियाच्या कॅसेटकिनाने रूमानियाच्या बेगुचा 4-6, 6-4, 7-6 (7-1), बेलारूसच्या माजी टॉप सीडेड अझारेंकाने रशियाच्या ऍलेक्सेंड्रोव्हाचा 7-5, 3-6, 6-1, झेकच्या प्लिसकोव्हाने अमेरिकेच्या गॉफचा 5-7, 6-3, 6-2 आणि अमेरिकेच्या ब्रॅडीने आपल्याच देशाच्या अनुभवी व्हिनस विलीयम्सचा 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.