प्रतिनिधी/ बेळगाव
विनाशल्यक्रिया हृदय चिकित्सेसाठी आणि मधुमेह, हृदयविकार यासारख्या घातक रोगांवर यशस्वी उपचार करणारे माधवबाग, वैद्य साने ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या संयुक्त विद्यमाने ‘हृदयरोग मुक्त कर्नाटक’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवार दि. 12 रोजी दुपारी 4 वा. किल्ला तलाव येथील पै रिसॉर्ट येथून होणार असल्याची माहिती माधवबाग कर्नाटकचे वरि÷ विभागीय व्यवस्थापक डॉ. प्रसाद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोहिमेंतर्गत एक वर्षात 1 हजार रुग्णांना या रोगांच्या विळख्यातून सोडविण्याचा निर्धार माधवबागने केला आहे. माधवबागतर्फे देशभरातील 240 क्लिनिक व दोन हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील 15 वर्षांहून अधिक कालावधीपासून आयुर्वेदाच्या सामर्थ्याने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मानसिक तणाव यासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर यशस्वी उपचार करत असल्याचे वैद्य साने ट्रस्टचे सीएसआर प्रमुख डॉ. मिलिंद सरकार यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी माधवबागने कर्नाटकमध्ये उपचार देण्यास सुरुवात केली. सध्या कर्नाटकात 12 क्लिनिक आहेत. ‘आरोग्यम हृदय संपदा’ या मोहिमेची बेळगावमधून सुरुवात होणार आहे. या मोहिमेंतर्गत जनजागृती, तपासणी व उपचार असा तिहेरी कार्यक्रम राबविला जाणार आहे. मंगळवारच्या कार्यक्रमामध्ये या रोगांच्या विळख्यातूत पूर्णपणे मुक्त झालेल्या 50 रुग्णांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल डॉ. मनोज सुतार, रोटरी क्लब ऑफ दर्पणच्या शीतल चिलमी यांसह मान्यवर उपस्थित होते.