ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. यासोबत त्यांनी पीएम केअर फंडमध्ये मदतीचं आवाहन केले आहे. मोदींनी हाक देताच अनेक उद्योजक, सेलिब्रिटींनी मदतीचा हात दिला आहे.
आता धकधक गर्ल माधुरी दीक्षित ने मदतीचा हात पुढे केला आहे. स्वतः माधुरीने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.
ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, आपण सर्वांनी मिळून हे युद्ध जिंकण्याची गरज आहे. मी माझ्या कडून काही रक्कम पंतप्रधान सहाय्यक निधीत व मुख्यमंत्री सहाय्यक निधीत देत आहे. तुम्ही देखील पुढे येऊन मदत करा, असे आवाहन माधुरीने जनतेला केले आहे.
मात्र तिने किती मदत केली आहे, याचा आकडा अजून कळला नाही आहे.
दरम्यान, आता पर्यंत बॉलीवुड मधील सलमान खान, दीपिका, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, वरून धवल, कपिल शर्मा, प्रियांका आदी कलाकारांनी मदत केली आहे.