ऑनलाईन टीम / मुंबई :
मानखुर्दमध्ये भीषण आग लागली आहे. मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. धुराचे मोठे लोळ हवेत पसरताना दिसत आहे. आगीने अत्यंत रौद्र रुप धारण केले आहे. आगीला विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 ते 15 गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग लेवल 3 ची आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहावी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिथे आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटले जाते. ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली करण्यास सुरुवात केली आहे.
या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.