फॉरेन्सिक तज्ञांकडून घटनास्थळाची पाहणी : पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी कोंडसकोपजवळील हणमंतवारीनजीक आढळून आलेली मानवी कवटी व हाडे वैज्ञानिक पृथःकरणासाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बस्तवाड येथील मारुती पिराजी बेळगावकर (वय 43) यांनी रविवारी सायंकाळी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी फिर्याद दिली असून भा.दं.वि. 302, 201 अन्वये अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2021 ते 30 जानेवारी 2022 या वेळेत अज्ञाताचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हणमंतवारी परिसरातील गवताळ भागात आढळून आलेली मानवी कवटी, हाडे, दातांचा जबडा, जीन्स पँटचा तुकडा हिरेबागेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर सोमवारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी आदी वरि÷ अधिकाऱयांनी घटनास्थळी पाहणी केली.
खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे दिसून येते. ऍसिड किंवा इतर ज्वालाग्रही पदार्थांचा वापर करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जिथे मृतदेह जाळण्यात आला आहे, तेथील जमीन नापिक झाल्याचे आढळून आले आहे. यावरून गुन्हेगारांनी
ऍसिडचा वापर केल्याचा संशय बळावत आहे.
जीन्स पॅन्टचा तुकडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आता कवटी, हाडांवरून खून स्त्राrचा झाला की पुरुषाचा याचा शोध घेण्यात येणार आहे. वैज्ञानिक पृथःकरणानंतरच यासंबंधी बरीच माहिती उघडकीस येणार आहे. सोमवारी फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या परिसरात मानवी कवटीचे गूढ उकलण्यासाठी आणखी काही पुरावे सापडतात का? याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी हातातील कडे आढळून आले आहे. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. यासंबंधी सोमवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. अज्ञाताचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी कोणाला माहिती असल्यास हिरेबागेवाडीचे मंडल पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांच्याशी 9480804032 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.