वजन जाणून घेतल्यावर व्हाल दंग
सलूनमध्ये केस कापून घेतल्यावर त्या केसांचे काय केले जाते ही माहिती कधी जाणून घेतलात का? अनेक ठिकाणी हे केस कचऱयात टाकले जातात. तर काही ठिकाणी हे केस विकून त्यांच्याद्वारे नकली विग तयार केले जातात. परंतु अमेरिकेतील एका सलूनचालकाने स्वतःच्या ग्राहकांच्या कापलेल्या केसांसोबत काहीतरी आगळेवेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्याने या केसांपासून जगातील सर्वात मोठा चेंडू तयार केला आहे.
ओहियोच्या कॅम्ब्रिज शहरात स्टीव वॉर्डेन नावाचा व्यक्ती पेशाने बार्बरचे काम करतो आणि त्याच्या सलूनचे नाव ‘ब्लॉकर्स’ आहे. सध्या स्टीव अत्यंत चर्चेत आहे. स्टीवने एकटय़ाने एका विशाल चेंडूची मानवी केसांद्वारे केली आहे. या अनोख्या कामगिरीमुळे स्टीवचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
9 वर्षे लागली
2013 मध्ये स्टीव यांचा छोटा मुलगा कॉलेजमध्ये शिकण्यास जाऊ लागल्यापासून त्यांच्याकडे चांगला वेळ शिल्लक राहू लागला होता. त्यांची मुले त्यांना केसांपासून चेंडू निर्माण करण्याची प्रेरणा द्यायचे. परंतु स्टीव यांनी ही बाब तेव्हा गांभीर्याने घेतली नव्हती. काही काळानंतर स्टीव यांनी चेंडूच्या निर्मितीस प्रारंभ केला. त्यांनी स्वतःच्या सलूनमध्ये एक यंत्रण बसवून घेत जमिनीवर पडलेले केस एका जाळय़ाच्या माध्यमातून एका खोलीत पोहोचविण्याची व्यवस्था केली.
102 किलो वजनाचा चेंडू
मोठय़ा प्रमाणावर केस जमा झाल्यावर त्यांनी दुकानातून अनेक प्रकारचे ग्लू खरेदी करत केस चिकटविण्यास प्रारंभ केला. हळूहळू स्टीव या चेंडूत केस जोडत गेले आणि सुमारे 9 वर्षांनी चेंडूने विशाल आकार घेतला. आज या चेंडूछो वजन 102 किलो आहे.2018 मध्ये रिप्लिज बिलिव्ह इट ऑर नॉटने ऑरलँड कॉमिक कॉनमध्ये या चेंडूचे प्रदर्शन आयोजित केले होते. हे पाहून लोकांनी स्वतःचे केस देखील दान केले होते. परंतु आता या चेंडूच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. हा चेंडू माझ्या मुलांच्या प्रेमाखातर तयार केला आहे. माझ्या भावी पिढय़ांनीही हा चेंडू पहावा अशी इच्छा असल्याचे स्टीव म्हणाले.