फोर मोअर शॉट्स प्लीज फेम अभिनेत्री
‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गाग्रूने साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे. तिने अंगठी घातलेले छायाचित्र शेअर केले आहे. तसेच ती सध्या लंडनमध्ये सुटी घालवत आहे. परंतु मानवीचा होणारा पती कोण याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मानवी गाग्रू काही काळापासून लंडनमध्ये सुटय़ांचा आनंद घेत आहे. तेथील अनेक छायाचित्र ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच तिने चाहत्यांना एंगेजमेंट रिंग दाखविणारे छायाचित्र शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘आणि हे घडलंय’ अशी कॅप्शन देत तिने खाली हॅशटॅग एंगेज्ड असे नमूद केले आहे.
मानवीच्या या पोस्टवर मौनी रॉय, सुमित व्यास आणि तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मानवीने कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता आणि बानी जे यांच्यासोबत ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिन्ही भागात काम केले आहे. याशिवाय ती सुमित व्यासबरोबर ‘ट्रिपलिंग 3’मध्येही दिसून आली होती. अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.