अर्जेंटीनामधील घटना
जगभरात मानवी हव्यासाला निसर्ग बळी पडत आहे. अर्जेंटीनाच्या दक्षिण पटागोनिया भागात एका विशाल सरोवराचे पाणी आता गुलाबी रंगाचे झाले आहे. हे सरोवर गुलाबी होण्यामागे एक रसायन कारणीभूत असून त्याचा वापर झिंगा माशाची निर्यात करण्यासाठी केला जातो अशी माहिती तज्ञ तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिली आहे.
या सरोवराच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे बदलला आहे. हे एक अँटी बॅक्टेरियल प्रॉडक्ट असून त्याचा वापर माशांच्या फॅक्ट्रीत केला जातो. यातून निघणारे सांडपाणी आणि कचरा चूबूत नदीला प्रदूषित करत असल्याचा आरोप आहे. या नदीचे पाणी कोर्फो सरोवर आणि पाण्याच्या अन्य स्रोतांमध्ये जमा होते.
नदी आणि सरोवराच्या आसपास अनेक पर्यावरणला नुकसान पोहोचविणाऱया गोष्टी घडत आहेत, पण आतापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नसल्याची तक्रार स्थानिक लोक दीर्घकाळापासून करत आहेत. ज्या लोकांकडे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी आहे, तेच लोकांना विष देत आहेत असे पर्यावरण कार्यकर्त्या पाब्लो लादा यांनी म्हटले आहे.
पाण्याचा हा रंग सोडियम सल्फेटमुळे गुलाबी झाला आहे. कायद्यानुसार माशांचे अवशेष नदी किंवा पाण्यात सोडण्यापूर्वी ते साफ केले जावेत. सरोवरानजीकची कंपनी कायद्याचे पालन करत नसल्याचे पर्यावरण विषयक इंजिनियर फेडेरिको यांनी म्हटले आहे.