बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आइरा चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी एक आहे. आइरा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. सोशल मीडियावरील तिची फॅन फॉलोइंग कुठल्याही स्टारपेक्षा कमी नाही. स्वतःच्या मनातील गोष्टी आई रीना दत्ताला सांगत असल्याचे आइराने म्हटले आहे.
आइराने मानसिक आरोग्यावरून आगात्सू फौंडेशन सुरू केले आहे. यात ती ‘पिंकी प्रॉमिस टू मी’द्वारे स्वतःच्या जीवनातील अनुभव देखील शेअर करत असते. आइराने स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवरुन एक छायाचित्रही शेअर केले आहे. या छायाचित्रात ती आईसोबत एका कारमध्ये बसलेली दिसून येते. या छायाचित्रासोबत आइराने स्वतःच्या आईसाठी विशेष पोस्ट देखील केली आहे. आइराने कंफर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा सल्ला प्रत्येकाला दिला आहे. आइरा देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. पण आइरा सध्या स्वतःच्या अफेयरमुळे अधिक चर्चेत असते.