स्वतःच्या कामामुळे मिळत नव्हता आनंद
काही वर्षांपूर्वी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अभिनयातून बेक घेतला होता असे बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरीने एका मुलाखतीत म्हटले आहे. स्वतःच्या कारकीर्दीच्या प्रारंभी नर्गिसने ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर नर्गिसला फारसे यश मिळू शकलेले नाही. याचमुळे तिने काही दिवस चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत स्वतःच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले. परंतु नर्गिस आता भारतात परतली असून लवकरच दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होणार आहे.
माझ्यावर कामाचा दबाव खूपच अधिक येत असल्याचे जाणवू लागले होते. मी माझे मित्र आणि कुटुंबालाही मिस करत होते. 2016 आणि 2017 मध्ये या कामामुळे मला आनंद मिळत नसल्याची जाणीव झाली. मी एका मागोमाग एक चित्रपट करत गेले होते. स्वतःचा मेंदू आणि शरीर यांच्यात संतुलन रोखण्यासाठी काम रोखावे लागेल याची जाणीव झाल्यानेच हे पाऊल उचलले होते असे नर्गिसने म्हटले आहे.
अनेक लोक अशाप्रकारचा ब्रेक घेण्यास घाबरतात, कारण त्यांना पुनरागमनानंर लोक स्वीकारतील की नाही याची भीती असते. अनेकदा एकटे राहणे अवघड असते. माणूस म्हणून सर्वांना सपोर्ट सिस्टीम असणे गरजेचे आहे. याचमुळे मी न्यूयॉर्कमध्ये परतले होते. दीर्घकाळानंतर मित्र आणि कुटुंबीयांसोबत मोठा वेळ घालविल्याने आता मी पूर्णपणे बरी असल्याचे नर्गिस म्हणाली.