22 समुपदेशक करणार तणावमुक्तीचे मार्गदर्शन : सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन : घाबरु नका, आम्हाला फोन करा
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या धास्तीमुळे लोकांना शारीरिक त्रास होत आहे. तसेच मानसिक तणावालाही तोंड द्यावे लागत आहे. अशा लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्पलाईन नावाचा उपक्रम सुरु केला आहे. वीसपेक्षा अधिक तज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून मनोबल हेल्पलाईन चालवली जाणार आहे, अशी माहिती अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
कोरोनामुळे सगळा समाज धास्तावलेला आहे. जगभरातून येणाऱया बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम तर होत आहेतच, पण मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणे हे सुद्धा ताणाचे कारण असू शकते. कोरोनाबद्दल खूप उलटी सुलटी माहिती समाजमाध्यमांमधून पसरत असल्याने आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू असे विचारही त्रास देवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या साथीमुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा वाटत असेल अशा लोकांना समजून भावनिक आधार आणि समुपदेशन मनोबल हेल्पलाईनच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ज्यांना मन मोकळं करण्याची, आधाराची गरज वाटली तर सोबतच्या नंबरवर फोन करावा, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले आहे. मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांनादेखील केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील.
भावनिक प्रथमोचाराचे मोफत प्रशिक्षण
आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा याविषयीचे ‘चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकूया’ हे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित केले जात आहे. हे प्रशिक्षण घेतलेले लोक स्वतःच्या आणि मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्या कोरोना संबधित चिंता, भीती अधिक प्रभावीपणे हाताळू शकतात. ज्यांना हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी रेश्मा कचरे 9561911320 / योगिनी मगर 9665850769 या क्रमांकावर नावनोंदणी करावी. हे प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे.
मनोबल हेल्पलाईन
राजेंद्र पवार 9421909799 संध्याकाळी 4 ते 6., चंद्रकांत भिसे 7507660111 सकाळी 11 ते 6. सुनिता भोसले 9552459553 पूर्णवेळ, राणी बाबर-9923095901, योगिनी मगर 9665850769, रुपाली भोसले-8149278509, मोरेश्वर देशमुख 9860414603, माधुरी आवटे 9420216505 दुपारी 1 ते 6, श्रुती मधूदीप 8788974365- दुपारी 2 ते 5, नंदिनी जाधव-9422305929, कृतार्थ शेवगावकर 9823974400, राजू इनामदार 9822917580, नितीन लेले 9284914172, रेश्मा कचरे 9561911320, अर्चना बिरदवडे 9209834762 वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 7., योगेश बागडे 9767358855, रश्मी भुवड7350403674, साधना बाजारे 9011017763., रोहिदास गायकवाड 8698941642, सुनिता देशमुख-7020402352 ( दुपारी 2 ते 6)., 21.प्रभाकर नाईक 7719838747, प्रिया कदम पूर्णवेळ-9923886741., अण्णा कडलासकर 9270020621.