वेंगुर्ले /प्रतिनिधी-
वेंगुर्ले उभादांडा येथील विलास कुबल यांच्या मानसीश्वर पेट्रोल पंपतर्फे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत देण्यात आले. मानसीश्वर पेट्रोल पम्प ने ब्रावझर गाडीतून घरपोच डिझेल सुविधा सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ वेंगुर्ले उप जिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत देवून करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल मुळे, नर्स मांजरेकर, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ, शैलजा मुळीक, मकरंद कुबल, संग्राम धुरी आदी उपस्थित होते.