क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे डेव्हलपमेंट फौंडेशन फुटबॉल स्पर्धेत 8 वर्षाखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस स्पोर्ट्स क्लबच्या संघाने आरसीए बेंगळूर संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
बेंगळूर येथे बीगूर टर्फ मैदानावर डेव्हलपमेंट फौंडेशन फुटबॉल स्पर्धेत बेंगळूर, होसूर, कोईमतुर व बेळगाव येथील संघानी भाग घेतला होता. मानस स्पोर्ट्स संघाने पहिल्या सामन्यात पीएफसी बेंगळूर संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात हुसेन जमादारने 4 गोलासह स्पर्धेतील पहिली हॅट्रीक नोंदविली. आराध्य नाकाडीने 1 गोल केला.
दुसऱया सामन्यात रामन स्पोर्ट्स अकादमी बी संघाचा 12-0 असा एकतर्फी पराभव केला. आराध्य नाकाडी व हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 5 गोल तर झेन मुल्ला व ओएस मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने बेंगळूरच्या आरएसए संघाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. प्रारंभी बेंगळूर संघाने 1-0 आघाडी मिळविली होती. पण दुसऱया सत्रात मानस स्पोर्ट्स संघाने आक्रमक चढाया केल्या. झेन मुल्लाने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आराध्य नाकाडी व हुसेन जमादार यांनी गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली. बेंगळूरतर्फे मंजुनाथने एकमेव गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या मानस स्पोर्ट्स व उपविजेत्या आरएसए बेंगळूर संघाला आकर्षक चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृ÷ खेळाडू म्हणून आराध्य नाकाडी, स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा हुसेन जमादार व उत्कृष्ट बचावपटू म्हणून झेन मुल्ला यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.