क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे राष्ट्रीय चिल्ड्रन्स डे ग्रिट अँड बोल फुटसाल चषक 8 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट संघाने आर. सी. प्रकाश फुटबॉल संघाचा 3-0 असा पराभव करुन एआयएफएफ राष्ट्रीय चषक पटकाविला.
बेंगळूर येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मानस स्पोर्टस् संघाने मेरीगोल्ड संघाचा 9-0 असा पराभव केला. या सामन्यात झैन मुल्ला व हुसेन जमादार यानी प्रत्येकी 3 गोलासह हॅट्ट्रीक केली. आराध्य नाकाडीने 2 तर ओवासीस मुल्लाके 1 गोल केला.
दुसऱया सामन्यात एमएसजीएफ संघाने व्हीपीएस संघाचा 6-0 असा पराभव केला. हुसेन जमादार व आराध्य नाकाडी यांनी प्रत्येकी 2 गोल तर जैन मुल्ला, ओव्हीस मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
अंतिम सामन्यातील पहिल्या सत्रात मानस अकादमीला आरसी प्रकाश संघाने शून्य बरोबरीत रोखले होते. पण दुसऱया सत्रात मानस स्पोर्ट्स संघाने 3-0 अशी आघाडी मिळविली. आराध्य नाकाडी, हुसेन जमादार व जैन मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आरसी प्रकाश यांच्या हस्ते विजेत्या मानस स्पोर्ट्स संघाला व उपविजेत्या आर. सी. प्रकाश संघाला चषक, पदके, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.