वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला जलतरणपटू माना पटेलने फ्रान्समध्ये सुरू असलेल्या मेअर नॉस्ट्रम जलतरण स्पर्धेतील कॅनेट येथे झालेल्या टप्प्यात महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सर्वात जलद भारतपीय वेळ नोंदविली.
गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत गुजरातच्या माना पटेलने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. फ्रान्समधील स्पर्धेत रविवारी तिने महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 01ः03.69 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडाप्रकारातील माना पटेलची ही सर्वात जलद वेळ आहे. गेल्यावर्षी बेलग्रेडमध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत माना पटेलने महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 01ः03.77 सेकंदाची सर्वोत्तम जलद वेळ नोंदविली होती पण तिने फ्रान्समधील स्पर्धेत स्वतःचाच नोंदविलेला विक्रम मागे टाकला.