ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यंदा मान्सून नियोजित वेळेच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 मे ला केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला असून, पुरेशा बाष्पानेही दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे.
सध्या मान्सूनने अंदमान निकोबार बेटसमूह तसेच श्रीलंकेचा दक्षिण किनाराही व्यापला आहे. मात्र, वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. 1 जूनपासून नैऋत्येकडून येणाऱ्या या वाऱ्यांचा वेग वाढून केरळात पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर 3 जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.