‘सर्व मोदी चोर’ असल्याची टिप्पणी
सूरत : अवमानाच्या एका खटल्यात गुरुवारी सूरत येथील न्यायालयात हजर राहिलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी आडनावावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱया राहुल गांधी यांनी मी केवळ उपरोधिक टिप्पणी करत होतो आणि आता त्याविषयी फारसे आठवत नसल्याचे म्हटले आहे. कुठल्याही समुदायाला लक्ष्य करण्याचा माझा उद्देश नव्हता. मी केवळ निवडणुकीदरम्यान टीका करत होतो असे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी माफी मागणार नसल्याचे त्यांच्या वकिलानेही सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे.