नवी दिल्ली
दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्पने मायकल क्लार्क यांची सीओओपदी नियुक्ती केली आहे. आपल्या पदाचा कार्यभार ते 1 जानेवारी 2021 पासून सांभाळणार आहेत. मायकल क्लार्क यांना जागतिक अनुभव चांगला असून किचकट समस्यांची हाताळणी, आंतरराष्ट्रीय आवश्यक ते बदल, संघटनात्मक बदल यासारख्या बाबींमध्ये चांगला अनुभव असल्याचे हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी सांगितले. हिरो मोटोकॉर्पमधील संघटनात्मक बाजू अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. संघाच्या नेतृत्व गुणासंदर्भातील त्यांच्या अनुभवाचा कंपनीला नक्कीच फायदा होईल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.