फक्त शुल्क आकारल्यावरच सुविधा : स्पर्धेक ऍपशी टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनीने व्हिडीओ परिषदेसाठी मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये 250 जणांना एकत्रितपणे बैठक घेण्याची सुविधा उपलब्ध दिली जाणार आहे. या अगोदर या ऍपच्या आधारे फक्त 100 लोकांना सहभाग घेण्याची सुविधा होती. या अपडेट केल्याच्यानंतर ही सहभागी करण्यासाठीची सोय वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सदर ऍपच्या यंत्रणेत बदल करण्यासोबच कंपनी गुगल मीट आणि झूम ऍप यांनाही टक्कर देण्यात यशस्वी होणार असल्याचा दावा केला आहे. लॉकडाऊनच्या कारणामुळे सध्या घरातून काम करणाऱयांची संख्या मोठी आहे. यातून व्हिडीओ परिषद घेण्यासाठी सदर ऍपच्या वापरांवर भर दिला जात आहे. सध्याच्या कालावधीत मायक्रोसॉफ्ट टीम्सचे 7.5 कोटी ग्राहक संख्या असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
मोफत व्हर्जनची सोय
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टीम्स ऍपमध्ये चालू महिन्यांत काही फिचर अपडेट करण्यात येणार आहेत. यात शुक्ल आकारण्यात आल्यावरच यातील मोफत 20 लोकांना एकत्रित बैठकीसाठी सहभाग घेण्याची सोय कंपनीकडून देण्यात येणार आहे.