प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील कित्तेक ठिकाणी नागरिक हे कोरोना बाधित असल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. हा भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन असल्याने येथे इतर नागरिकांना येण्याजाण्यासाठी सक्त मनाई असते. कोणत्या भागातील नागरिक होम कॉरंटाईन आहेत हे कळण्याकरीता तेथे स्टिकर ही लावण्यात येते. पण संबंधीत विभागाच्या कर्मचाऱयांतर्फे हे स्टिकर लावण्याकरीता विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्या शहरातील बऱयाच अपार्टमेंट मधील नागरिकांमध्ये कोरोना संबंधीची लक्षणे दिसुन आली असल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर बांबु बांधलेले असतात. पण आत अनेक फ्लॉट धारक निवास करतात, त्यापैकी नेमके कोणत्या फ्लॅटमधील नागरिक हे होमआयसोलेशन मध्ये आहे हे कळणेच मुश्किल बनते.
त्यामुळे ज्याक्षणी संबंधीत रहिवासी हे कोरोना बाधीत असल्याचे कळताच क्षणाचाही विलंब न करता कर्मचाऱयांनी येथे योग्य ती दक्षता घेऊन ‘बेक दी चेन’ अंतर्गत तेथे सुचना फलक लावावा. जेणे करून इतर नागरिकांना ही याची कल्पना येईल.