ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मायलन या जागतिक फार्मा कंपनीचे कोरोनावर प्रभावी ठरलेले ‘रेमडेसिवीर’ हे औषध ‘DESREM’ नावाने भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. मायलनचे अध्यक्ष, राकेश बमझाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना संशयित आणि कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या लहान मुले आणि प्रौढांसाठी हे औषध उपयुक्त ठरते. कोरोनावर मात करण्यासाठी मायलनचे अथक प्रयत्न सुरू आहेत. मायलनने जेनेरिक रेमडेसिवीर (DESREM TM) ची पहिली बॅच तयार केली आहे. या औषधाची वाढती गरज लक्षात घेता मायलन त्यांचा पुरवठा वाढवणार आहे.
मायलन DESREM TM चांगल्या दर्जात व इंजेक्शनच्या रूपात बंगळुरूमध्ये तयार करून ते भारतात व इतर एक्स्पोर्ट बाजारपेठेत उपलब्ध करणार आहे. बाजारपेठेत DESREM TM उपलब्ध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मायलनने आरोग्यसेवक व रुग्णांकरिता 24/7 उपलब्ध असणारी एक हेल्पलाईन सुविधाही लॉन्च केली आहे.