प्रतिनिधी / बेळगाव
मारवाडी युवा मंच, पंख (लेडिज विंग) व उडान (यूथ विंग) या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 16 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात हे शिबिर घेतले जाणार आहे. महावीर ब्लड बँकेचे डॉक्टर्स रक्त संकलन करतील. अधिकाधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रेडक्रॉसतर्फे आज रक्तदान शिबिर
रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. 14 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वा. बिम्सच्या आवारामध्ये हे शिबिर घेतले जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, सीईओ एच. व्ही. दर्शन, डीएचओ एस. व्ही. मुन्याळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन सेपेटरी डी. एन. मिसाळे यांनी केले आहे.