वैयक्तिक कारणातून घडली घटना
प्रतिनिधी /बेळगाव
फळविपेत्याला मारहाण केल्यानंतर गणपत गल्ली, कडोलकर गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता. बाजारपेठेत एकच धावपळ सुरू झाली. चौकशीअंती वैयक्तिक कारणातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री 7.15 वाजण्याच्या सुमारास एका फळविपेत्याला मारहाण करण्यात आली. जावेद (वय 46, रा. उज्ज्वलनगर) असे मारहाणीत जखमी झालेल्या फळविपेत्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या घटनेनंतर बाजारपेठेत धावपळ उडाली. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.