वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने 3 लाखावी वॅगनआर एस सीएनजी कारची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. सीएनजी गटातील ही सर्वाधिक कार विक्री समजली जात आहे.
वॅगनआरने तिसऱया जनरेशनमधील कंपनीने जवळपास 24 लाख कुटुंबियांना आपली सेवा दिली आहे. यामधील जवळपास 24 टक्के लोकांची पसंती या गाडीला मिळाली आहे. भारतामध्ये सीएनजी वाहनांची सर्वाधिक विक्री होत आहे. यामध्येच वॅगनआर एस या मॉडेलने 3 लाखाव्या कार विक्रीचा आकडा पार केला आहे. प्रत्येक वर्षात सीएनजी गाडीमध्ये वॅगनआर एस ही सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. सदर गाडीची रचना ही आकर्षक डिझाईनची असून यामध्ये उंची सीट, अधिकची जागा या कारणामुळे जवळपास 24 टक्के ग्राहकांनी या गाडीला पसंती दर्शवली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
दोन दशकापासून टॉपवर
भारताच्या टॉप 10 कार्समध्ये मारुती सुझुकी राहिली असल्याची माहिती असून गेल्या दोन दशकापासून पहिल्या 10 कारमध्ये आहे.