नवी दिल्ली
लॉकडाऊनसोबत कोविड 19 ला टक्कर देण्याच्या लढाईत अनेकांची विविध प्रकारची खरेदी लांबणीवर पडत आहे तर काहीजणांना वेतनात कपात व अवेळी वेतन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु या सर्व लढाईत ग्राहकांना मारुती सुझुकीची गाडी विकत घेणे अधिक सोपे होणार आहे. कारण आता मारुती सुझुकी इंडिया आणि आयसीआयसीआय बँक विशेष सवलत घेऊन येत आहेत. बँक आणि मारुती कंपनी हे एकत्र आल्यामुळे ग्राहकांना कमी रक्कमेत आपल्या आवडीची गाडी खरेदी करता येणार आहे. कारण आयसीआयसीआय बँकेने फ्लेक्सी ईएमआयची विशेष योजना सादर केली आहे. ज्याच्या आधारे ग्राहकांना सुरुवातीला कमी रक्कमेचे हप्ते भरण्याची सोय प्राप्त होणार आहे. म्हणजे गाडी विकत घेतल्यानंतर पहिल्या हप्त्याची रक्कम पहिल्या तीन महिन्यांसाठी 1 लाखांच्या कर्जावर 899 रुपये इतकी राहणार आहे.
असल्याची माहिती आयसीआयसीआय बँकेने दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मारुती सुझुकीची 3,000 पेक्षा अधिक आउटलेटस आणि आयसीआयसीआय बँकेच्या देशभरात 5,380 शाखांचे जाळे आहे. ही योजना गाडी खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.