वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मारुती सुझुकीच्या ‘जिम्नी’ या नव्या पाच दरवाजे असणाऱया कारची माहिती काही प्रमाणात समोर येत आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये सदरची गाडी बाजारात दाखल केली जाणार आहे.
नवीन अहवालानुसार ऑफ रोड एसयूव्ही पुढील वर्षात सादर केली जाणार आहे. सदरची नवी गाडी ऑटो एक्स्पो 2020 मध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात आली होती. यानंतर या मॉडेलबाबत चर्चा रंगू लागली होती. मागील महिन्यात या गाडीचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. सदरचे वाहन हे ऑक्टोबर 2021 मध्ये होणाऱया टोकीयो मोटर शोच्या दरम्यान सादर करण्यात येणार होते. परंतु कोविड संसर्गाच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे हा शो रद्द करण्यात आला आहे.
इंजिन क्षमता
ही कार ऑफ रोड 1.5 लिटर, 4 सिलिंडर के 15 बी पेट्रोल इंजिनसह येणार आहे. हे इंजिन 6000 आरपीएमपेक्षाही 101 बीएचपी पॉवर आणि 4,000 आरपीएमवर 130 एनएमचे टॉर्क जनरेट करणार आहे. हेच इंजिन न्यू ब्रेझा, अर्टिगा आणि सियाजमध्येही येणार आहे. गाडीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल किंवा 4 स्पीड ऑटोमेटिकचा पर्याय उपलब्ध होणार आहे.